मुंबई

तहसीलदार कार्यालयावर ‘एसीबी’चा छापा

CD

विरार, ता. २२ (बातमीदार) : वसई तहसीलदार कार्यालयासह अकृषिक विभाग भ्रष्टाचाराच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वसईचे अपर तहसीलदार (अकृषिक) विनोद बाळकृष्ण धोत्रे यांच्या कार्यालयातील खासगी व्यक्तीला अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी तक्रारदारांकडून सात लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (ता. २१) सायंकाळी सापळा रचून रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई पूर्वेकडील गाव मौजे देपिवली येथे तक्रारदारांची जमीन आहे. या जागेवरील अनधिकृत बांधकाम प्रशासनाकडून पाडले जाऊ नये आणि ही जागा अकृषिक करून द्यावी, यासाठी सुरुवातीला तब्बल ४० लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती, तर अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी १० लाखांची मागणी केली होती; मात्र अखेर तडजोडीनंतर सात लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. या मागणीबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता तक्रारीची शहानिशा केल्यानंतरच विभागाच्या पथकाने वसईत मंगळवारी सापळा रचला आणि सात लाखांची रोकड घेताना अपर तहसीलदार कार्यालयाशी संबंधित खासगी व्यक्ती अनिल प्रभाकर चौबल याला पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी विनोद धोत्रे यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

कारवाईच्या भीतीने फरार
या प्रकरणात अपर तहसीलदारांचा सहभाग असल्याचेही समोर आल्याने आपल्यावर कारवाई होणार, या भीतीने ते फरार झाले आहेत. ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील, अपर अधीक्षक सुहास शिंदे आणि अपर अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रूपाली पोळ व त्यांच्या पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain News : उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा; शहरात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक भागांत गारपीट

LSG vs RR Live: रिषभ पंत धडपडला... दोन्ही फलंदाज एकाच दिशेला.. चूक अन् राजस्थानला डोकं वर काढण्याची मिळाली संधी Video

Amravati Crime : जन्मदात्या आईचे मुलीसोबत धक्कादायक कृत्य, कारण वाचून तुम्हालाही येईल संताप

Pune News : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या; परीक्षा होण्यापूर्वीच समाजमाध्यमात प्रश्नपत्रिका प्रसारित

Buldhana News : गरिबीमुळे लग्न जुळत नाही, बुलढाण्यात दोन तरुणांनी जीवन संपवलं

SCROLL FOR NEXT