मुंबई

देवकाट्यांची स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी

CD

रावेच्या रायबा देवीची यात्रा उत्साहात
उंचच उंच देवकाट्यांची स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी
पेण, ता. २२ (वार्ताहर) ः कार्ला येथील आई एकवीरा देवीची यात्रा पार पडल्यानंतर ग्रामीण भागात यात्रांचे वारे वाहू लागतात, त्यात रावे येथील रायबादेवीची यात्रेचा उत्साह विशेष ठरला. या यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या देवकाट्यांच्या स्पर्धेने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
तालुक्यातील रावे गावातील रायबादेवीची यात्रेला मोठी परंपरा आहे. या यात्रेत पनवेल, मुंबई, ठाणे, पुणे, यासह महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. या यात्रेदरम्यान देवकाट्यांची स्पर्धा आयोजित केली जात असून यात जवळपास २० ते २५ फुट उंचच उंच देवकाट्या उभारण्यात येतात. गावातील तरुण वर्ग या देवकाट्यांचा मनसोक्त असा आनंद घेतात. गेली अनेक वर्ष सुरू असणारी ही परंपरा आजही तशीच टिकून असल्याचे पहावयास मिळत आहे. या यात्रेदरम्यान रायबा देवीचे दर्शन घेण्यासाठी आमदार रवींद्र पाटील, जिल्हा परिषद कृषी व संवर्धन सभापती वैकुंठ पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्यासह अनेक भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC: सवलतीत एसटीने प्रवास करता? १ ऑगस्टपासून हा नियम माहिती नसेल तर फटका बसू शकतो

Fifa World Cup 2026 : ३ रेड कार्ड, दोन भन्नाट गोल अन् १७ वर्षांच्या पोराचे पदार्पण... मेक्सिको-दक्षिण आफ्रिका, पहिलाच सामना गाजला

Yogi Avimukteshwaranand: योगी आदित्यनाथ - अविमुक्तेश्वरानंद वाद विकोपाला; ‘शंकराचार्य’ पदवीवर प्रश्‍नचिन्ह आणि गायीच्या दर्जावरून मतभेद

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! जून महिन्यात सोन्याच्या भावात मोठी घसरण; आज किती आहे दर?

Kolhapur Water Supply : कोल्हापूर शहराची ‘थेट पाईप’ बंद पडली, धरणातील पाणी संपल्याने निर्णय

SCROLL FOR NEXT