मुंबई

विना परवानगी वृक्ष छाटणीप्रकरणी एपीएमसीवर कारवाईची शक्यता

CD

विना परवानगी वृक्ष छाटणीप्रकरणी एपीएमसीवर कारवाई
मनपाची नोटीस, सात दिवसांत खुलासा मागवला
तुर्भे, ता. २२(बातमीदार) : वाशी येथील एपीएमसी फळ मार्केट परिसरात वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेता फांद्यांची छाटणी करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने एपीएमसी प्रशासनाला नोटीस बजावली आहे. संबंधित खुलासा समाधानकारक न मिळाल्यास कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एपीएमसी फळ मार्केट परिसरात निलगिरी आणि उंबराचे अशा दोन वृक्षांच्या फांद्यांची छाटणी वृक्ष प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता करण्यात आली. ही बाब महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संवर्धन व जतन अधिनियम, १९७५ अंतर्गत गंभीर मानली जाते. या अनुषंगाने अधिनियमाच्या कलम २१ (१) व (२) नुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच, निर्धारित मुदतीत खुलासा न दिल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. १० एप्रिल रोजी ही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, अद्याप एपीएमसी प्रशासनाकडून कोणताही अधिकृत खुलासा सादर करण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन पुढील टप्प्यात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी होर्डिंग लावणाऱ्या कंपनीचे जाहिरात फलक झाडांच्या फांद्यांमुळे झाकले जात असल्याने या फांद्या छाटण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. संबंधित ठेकेदाराच्या फायद्यासाठीच ही छाटणी करण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे. या प्रकरणी एपीएमसी फळ मार्केटच्या सुरक्षा विभागाने अंतर्गत अहवाल सादर केल्याचे समजते. मात्र, काही अधिकारी संबंधित ठेकेदाराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचीही चर्चा प्रशासनात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran ceasefire : इराणने डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधी धुडकावली; हॉर्मुझमध्ये गोळीबार, भारताकडे येणारे जहाज IRGC ने घेतले ताब्यात

Thane: ठाणेकरांवर पाणीटंचाईचे सावट, २४ तास पाणीपुरवठा बंद; कधी आणि कोणत्या भागात? वाचा सविस्तर...

संदीप पाठक भावूक! 'वऱ्हाड'च्या ६०० व्या प्रयोगाला जिवलग मित्रांनी दिलं विमानाचं 'सरप्राईज'

नवरदेव ऐनवेळी फरार, नवरीचे लग्न धाकट्या दिराशी लावले, पण आता वडिलांच्या अजब मागणीने सगळेच चक्रावले

Latest Marathi News Live Update: लग्न जुळत नसल्याने बुलडाणा जिल्ह्यात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या

SCROLL FOR NEXT