मुंबई

भिवंडीत चोरट्यांचा धुमाकूळ

CD

भिवंडी, ता. २२ (बातमीदार) : शहरातील विविध भागांत चोरीच्या घटना वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चोरट्यांनी एका वाईन शॉपला आणि एका दवाखान्याला लक्ष्य करत ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि रोकड लंपास केली. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, शोधमोहीम हाती घेतली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कल्याण येथील रहिवासी मनीष बजाज (३९) यांच्या मालकीचे ‘राधा वाईन्स’ हे दुकान भिवंडी-कल्याण मार्गावरील सरवली परिसरात आहे. १० एप्रिलला सायंकाळी ४च्या सुमारास काही संशयितांनी दुकानात प्रवेश करून ७६ हजार रुपये किमतीच्या दारूच्या पेट्या चोरून नेल्या. या घटनेनंतर दुकानमालकाने दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलिसांनी २० एप्रिलला म्हणजे घटनेनंतर दहा दिवसांनी संशयित माथाडी कामगार सूरज म्हात्रे, सुरक्षा रक्षक अंकित सरोज आणि व्यवस्थापक सचिन जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळे करत आहेत. दोन्ही घटनांमध्ये आरोपी फरार असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी सुरू आहे.

दवाखान्यातील मूर्ती गायब
दुसऱ्या घटनेत, कासार आळी येथील रहिवासी डॉ. हेमंत पुण्यार्थी (५८) यांच्या मालकीचा दवाखाना नारपोली येथील ‘साई सोमानी रेसिडेन्सी’च्या पहिल्या मजल्यावर आहे. १९ एप्रिलला दुपारी २ वाजल्यापासून २० एप्रिल सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरट्याने शेजारील दुकान क्रमांक ३ ची भिंत फोडून दवाखान्यात प्रवेश केला. चोरट्याने चांदीचा मुलामा असलेली गणपतीची मूर्ती आणि काही रोकड असा एकूण १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी २० एप्रिलच्या रात्री अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपासाची जबाबदारी पोलिस हवालदार प्रमोद जाधव यांच्याकडे सोपवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

Ranjangaon MIDC : रांजणगाव एमआयडीसीत मनसे कामगार युनियन स्थापनेवरून भाजप-मनसे आमनेसामने

SCROLL FOR NEXT