मुंबई

राजिपच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डाॅ. रुपाली सातपुते

CD

राजिपच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डाॅ. रुपाली सातपुते
अलिबाग, ता. २२ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डाॅ. रुपाली सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजिपचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांची पुणे येथे दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी राजिपच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे या प्रभारी म्हणून काम पाहात होत्या.
डाॅ. रुपाली सातपुते यांनी यापूर्वी पालघर जिल्ह्यातील कुपोषण नियंत्रण तसेच विकसित भारत संकल्प यात्रा यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे पालघर येथे आयोजित कोकण सरस महोत्सवासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. आता त्यांची रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी (ता. २२) रायगड जिल्हा परिषद येथे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जालिंदर पठारे यांनी त्यांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मंत्री होऊन ३ आठवडे झाले नाही, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामा देण्याची वेळ

IPL 2026 : हार्दिक पांड्यासोबत 'राडा'? भाऊ, कृणालने एकदाचं सर्व सांगूनच टाकलं; All OK? या प्रश्नावर म्हणाला...

इलेक्ट्रिक बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, डोकं चाकाखाली आल्याने मेंदू बाहेर; धक्कादायक घटना...

Latest Marathi News Live Update: धुळ्यात शेतकरी आणि महसूल कर्मचाऱ्यांमध्ये वाद

१९७० ते आजची 'जेन झी' पिढी! 'आमच्या पिढीची गोष्टच वेगळी' नाटकाचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT