मुंबई

नारीशक्ती विधेयकावरून ठाणे पालिकेत पुन्हा गदारोळ

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयकाच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी (ता. २२) जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. या विषयावर भाजपकडून मांडण्यात आलेल्या निषेध प्रस्तावावर चर्चा सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादावादी झाली. अखेर सभा अर्धा तास तहकूब करण्यात आली.

सभेच्या सुरुवातीला संसदेत नारीशक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांच्या भूमिकेचा निषेध करणारा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात आला. भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांनी विरोधकांवर महिलाविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला. विरोधकांनीही जोरदार प्रत्युत्तर देत महिलांना आरक्षण देण्यास विरोध नाही; मात्र जनगणनेपूर्वी लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करणे चुकीचे आहे, असा मुद्दा मांडला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी केंद्र सरकारवर टीका करीत राष्ट्रपतींना योग्य सन्मान दिला जात नाही, हेच महिलाविरोधी धोरण नाही का, असा सवाल उपस्थित केला. भाजप नगरसेवक सुरेश कांबळे यांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केल्यावर वातावरण अधिकच तापले. या वक्तव्याला राष्ट्रवादी व शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. सभागृह नेते हणमंत जगदाळे आणि नगरसेवक राम रेपाळे यांनी संबंधित वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर कांबळे यांनी आपले शब्द मागे घेतले.

महिलांवरील चर्चेचा वेळ वाया!
एमआयएमचे गटनेते सैफ पठाण यांनी या चर्चेमुळे सभागृहाचा वेळ वाया जात असल्याचे म्हटल्याने सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले. महिलांवरील चर्चेचा वेळ वाया जाणे कसे म्हणता, असा सवाल करीत त्यांनी पठाण यांना घेरले. यामुळे सभागृहातील वातावरण आणखी तापले. शेवटी स्थानिक प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी मागणी करीत पठाण यांनी हा विषय थांबवण्याचे आवाहन केले. सततच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

Ranjangaon MIDC : रांजणगाव एमआयडीसीत मनसे कामगार युनियन स्थापनेवरून भाजप-मनसे आमनेसामने

SCROLL FOR NEXT