मुंबई

महिला विधेयक नामंजूर होण्यात भाजपचाच हात

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : महिलांसाठीचे विधेयक नामंजूर होण्यात भाजपचाच हात असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य आरिफ नसीम खान यांनी केला. तसेच ‘खोटं बोला आणि सतत बोला’ हीच मानसिकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची असल्याची टीकाही त्यांनी केली.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खान यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. डिलिमिटेशनच्या नावाखाली महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. महिलांसाठी विशेष अधिवेशन आयोजित करून प्रत्यक्षात त्यांचा अवमान केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
खान यांच्या मते, हे विधेयक प्रत्यक्षात महिला आरक्षण बिल नसून कायदा संशोधन विधेयक आहे. २०२३ मध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांनी सुरुवातीला या विधेयकाला सहमती दर्शवली होती. मात्र, यामुळे लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांनी त्याला विरोध केला. महिलांसाठी प्रस्तावित ३३ टक्के आरक्षणाला सरकारने थेट सहमती द्यावी, अशी मागणी करताना खान यांनी स्पष्ट केले की, आरक्षणाच्या नावाखाली संविधानाची गळचेपी काँग्रेस सहन करणार नाही. या संशोधन कायद्यामुळे देशातील समावेशक व प्रगतिशील विचारसरणीला धक्का बसू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.


काँग्रेसचा महिलांना पाठिंबा कायम
माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मागणीनुसार २०२३ मध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे आला होता, याची आठवण करून देत खान यांनी, त्या वेळी राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून सक्रिय होते. महिलांसह मागासवर्गीय समाजांना काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिल्याचेही नमूद केले. भाजपचा दुतोंडी चेहरा लवकरच उघड केला जाईल आणि त्यासाठी काँग्रेसकडून पोलखोल मोहीम राबवली जाईल, असेही खान यांनी सांगितले. जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राहुल गांधी सातत्याने भूमिका घेत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
………………,
पक्षात महिला राज्याध्यक्ष का नाहीत?
भाजपमध्ये महिला नेतृत्वाला योग्य स्थान दिले जात नसल्याचा आरोप करत नसीम खान यांनी, पक्षात महिला राज्याध्यक्ष का होत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. महिलांविषयी प्रेम दाखवण्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

Ranjangaon MIDC : रांजणगाव एमआयडीसीत मनसे कामगार युनियन स्थापनेवरून भाजप-मनसे आमनेसामने

SCROLL FOR NEXT