सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : शहरातील सुमारे ५० वर्षे जुन्या आणि जर्जर झालेल्या मलनिस्सारण वाहिन्या बदलण्यासाठी ‘अमृत योजना २’ अंतर्गत ३५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होणार असून दीड ते दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.
जुन्या ठाण्यात ५० वर्षे जुन्या मलनिस्सारण वाहिन्या आहेत. त्या कमी आकाराच्या आणि जर्जर अवस्थेत आहेत. सध्या वाढलेल्या शहराच्या तुलनेत त्या अपुऱ्या आणि अरुंद ठरत आहेत. त्यामुळे या वाहिन्यांची वारंवार गळती होऊन रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी केळकर यांना मिळाल्या होत्या. त्यानुसार केळकर यांनी या मलवाहिन्या काढून त्या जागी मोठ्या आकाराच्या नवीन वाहिन्या टाकण्यासाठी पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारच्या ‘अमृत योजना २’ अंतर्गत ठाणे महापालिकेला शेकडो कोटींचा निधी मिळाला आहे. त्यापैकी ३५० कोटी रुपये मलवाहिन्या बदलण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. या पावसाळ्यानंतर वाहिन्या बदलण्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली. या पार्श्वभूमीवर या योजनेची माहिती नागरिकांना मिळावी, त्यांच्या याबाबतच्या तक्रारी आणि सूचना प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी केळकर यांनी खोपट येथील भाजप कार्यालयात संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या वेळी आमदार निरंजन डावखरे, हृषिकेश दंडे, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता नदीम काझी, अनंत बडे, आणि उप अभियंता सुनील सजनानी यांच्यासह ज्या भागातील वाहिन्या बदलण्यात येणार आहेत, त्या भागातील नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी या योजनेची माहिती नागरिकांना दिली, तर अनेकांनी भेडसावणाऱ्या समस्या आणि सूचनाही मांडल्या.
लोकसहभागातूनच यश
या संदर्भात आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभागाची गरज नमूद केली. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे. गेल्या पाच दशकांत ठाण्याची झपाट्याने वाढ झाली आहे. लोकसंख्या आणि बांधकामे वाढली. त्या तुलनेत मलवाहिन्या अपुऱ्या असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही योजना लोकसहभागातूनच यशस्वी होणार असल्याने बैठक घेतली होती. दीड दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.