नालेसफाईतील हलगर्जीमुळे वाशीतील नागरिकांचे हाल
शाळेजवळ गाळ रस्त्यावरच; विद्यार्थ्यांना घसरड्या रस्त्यांचा धोका
जुईनगर, ता. २२ (बातमीदार): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या नालेसफाई मोहिमेत काही ठिकाणी गंभीर हलगर्जी समोर येत आहे. वाशी विभागातील सेक्टर १६ परिसरात सेंट लोरेन्स शाळेजवळ नाले साफ करताना काढलेला गाळ रस्त्यावरच टाकून ठेवण्यात आला आहे.
हा गाळ वेळेत न उचलल्याने त्यावरून सतत वाहने जात असून रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. परिणामी परिसरात अस्वच्छता पसरली असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुर्गंधी आणि घाण यामुळे स्थानिक रहिवाशांचेही हाल होत आहेत.
विशेष म्हणजे, शाळेजवळच ही परिस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. दहावीच्या अतिरिक्त तासांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना घसरड्या रस्त्यावरून जावे लागत असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त करत तातडीने गाळ हटवून परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली आहे.
चौकट
चिखलमय रस्ता
नाले सफाईनंतर काढलेला गाळ वेळेत न उचलल्याने रस्ते चिखलमय झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर गंभीर परिणाम होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.