मुंबई

बाजारात कैऱ्या आणि काजूगरांची आवक वाढली

CD

बाजारात कैऱ्या, काजूगरांची आवक वाढली

विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : यंदा थंडीचा हंगाम समाधानकारक गेला असला तरी बदलत्या हवामानाचा आणि अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादकांना बसला आहे. काही भागांत आंबा उत्पादनात घट झाली असली तरी विक्रमगड आणि जव्हार बाजारपेठेत सध्या हिरव्यागार आंबट कैऱ्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे.

गेल्या पाच-सहा वर्षांपासून हवामानातील बदलामुळे पूर्वीइतका आंबा बाजारात येत नाही. परिणामी कैऱ्यांच्या दरात वाढ झाली असून, मोठ्या कैऱ्या १४० ते १८० रुपये किलो भावाने, तर लहान कैऱ्या सुमारे १०० रुपये किलो भावाने विकल्या जात आहेत. यासोबतच काही दिवसांपासून ओल्या काजूगरांचाही बाजारात प्रवेश झाला आहे. त्यामुळे स्थानिक महिलांना किरकोळ स्वरूपात रोजगार उपलब्ध होताना दिसत आहे. विक्रमगड आणि जव्हार हे आदिवासीबहुल तालुके असून, येथे शेती हेच प्रमुख उपजीविकेचे साधन आहे. औद्योगिक विकासाचा अभाव असल्याने स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात निसर्गावर अवलंबून आहेत. उन्हाळ्यात आंबा, काजू, करवंद, जांभूळ, फणस तर पावसाळ्यात रानभाज्या विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो.
------------------
चटणी, कोशिंबिरीसाठी कैऱ्यांना मागणी

बाजारात आलेल्या कैऱ्यांना बाहेरील ग्राहकांबरोबरच स्थानिक नागरिकांकडूनही मोठी मागणी आहे. घरगुती लोणचे, चटणी आणि कोशिंबिरीसाठी गृहिणी मोठ्या प्रमाणात कैऱ्या खरेदी करीत आहेत. तसेच भेळ विक्रेते आणि रिसॉर्ट चालकदेखील चवीसाठी कैऱ्यांचा वापर करीत असल्याने मागणी वाढली आहे. दरम्यान, काजूगरही २३० ते ३०० रुपये किलो दराने विकले जात असून, काजू फळांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. जव्हार येथील नव्या राजवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात काजूची जुनी झाडे असून, त्यांना यंदा भरपूर फळधारणा झाली आहे. ग्रामीण भागात घरासमोर आंबा व काजूची झाडे सर्वसाधारणपणे आढळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Fine: एसटी बस चुकीच्या ठिकाणी थांबवली तर कर्मचाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल करणार! MSRTC चा मोठा निर्णय, काय कारवाई होणार?

Ravi Shastri:"विराट कोहली 'अहंकारी आणि बिघडलेला मुलगा'? रवी शास्त्रींनी केला मोठा खुलासा; म्हणाले, तो फक्त मैदानातच..."

१६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय सांगितलं?

Sachin Pilgaonkar: '...पण हे सर्व कालच घडल्यासारखे वाटते‘, त्या खास छायाचित्रामुळे सचिन पिळगावकर रमले जुन्या आठवणींमध्ये

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

SCROLL FOR NEXT