स्ट्रक्टवेल डिझायनर्सतर्फे तुर्भेमध्ये रक्तदान शिबिर
सामाजिक बांधिलकीचा आदर्श
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : तुर्भे सेक्टर-२४ येथील स्ट्रक्टवेल डिझायनर्स कन्सल्टंट्स प्रा. लि. यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्लॉट क्रमांक १५, सायन-पनवेल महामार्गाजवळ पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कंपनीचे मालक वेणू रायकर यांनी स्वतः सहभाग घेत समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. विभूजता रायकर यांच्यासह कौतुभ, वैशाली आणि वृत्तीत्वानंद रायकर यांनीही आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
मुंबई व नवी मुंबई परिसरात रक्ताची कमतरता भासत असल्याने तातडीने हे शिबिर आयोजित करण्यात आले. सौ. निध्दा फार यांच्या समन्वयातून संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला. मुंबई महानगरपालिकेच्या रक्त संकलन अधिकारी डॉ. प्रिती मांगनी व वैद्यकीय समाजसेविका सरला खरवसिया यांनीही मोलाचे सहकार्य केले.
रक्तदान हेच जीवनदान हा संदेश देत अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.