मुंबई

कागदपत्रांची हेराफेरी करून वाटाणा आणि कलिंगडांच्या बियांची तस्करी, शासनाचे फसवणूक, डी आर आय ने केली कारवाई

CD

१३९ कोटींच्या वाटाणा, कलिंगड बियांची तस्करी उघड
जेएनपीए बंदरात डीआरआयची मोठी कारवाई
उरण, ता. २२ (बातमीदार) ः नवी मुंबईतील जेएनपीए बंदरातून बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रतिबंधित वस्तूंची तस्करी करणाऱ्या टोळीचा मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने पर्दाफाश सोमवारी (ता. २०) केला आहे. तूरडाळ असल्याचे भासवून बेकायदेशीरपणे आयात केलेला सुमारे १३९ कोटी रुपये किमतीचा वाटाणा आणि कलिंगडाच्या बियांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाला नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी बंदरात शासनाकडून प्रतिबंधित असणाऱ्या पिवळा आणि हिरवा वाटाणा बेकायदेशीररित्या आयात होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार १३२ कंटेनरची तपासणी केली असता, त्यात दोन हजार ७१० मेट्रिक टन कलिंगडाच्या बिया तंजानिया आणि सुदानमधून आणि ३१९ मेट्रिक टन हिरवा वाटाणा कॅनडातून आल्याचे आढळून आले आहे. या जप्त केलेल्या मालाची साधारणपणे १३९ कोटी रुपये किंमत असल्याचे समजते आहे.

शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी आयातीवर निर्बंध
भारत सरकारने देशी शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी हिरवा आणि पिवळा वाटाणाच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. हे केवळ कोलकाता बंदराद्वारे आणि ठराविक किमान आयात किमतीवर आयात केले जाऊ शकतात. मात्र, प्रतिबंध असतानाही जेएनपीएमार्गे आणले जात होते. ऑपरेशन डीप मॅनिफेस्टद्वारे दुबई आणि इतर देशांतून पाकिस्तानी बनावटीच्या किंवा प्रतिबंधित वस्तूंची चुकीच्या नावाने होणारी आयात रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने ही विशेष मोहीम राबवली आहे.

Pune Rain News : उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा; शहरात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक भागांत गारपीट

LSG vs RR Live: रिषभ पंत धडपडला... दोन्ही फलंदाज एकाच दिशेला.. चूक अन् राजस्थानला डोकं वर काढण्याची मिळाली संधी Video

Amravati Crime : जन्मदात्या आईचे मुलीसोबत धक्कादायक कृत्य, कारण वाचून तुम्हालाही येईल संताप

Pune News : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या; परीक्षा होण्यापूर्वीच समाजमाध्यमात प्रश्नपत्रिका प्रसारित

Buldhana News : गरिबीमुळे लग्न जुळत नाही, बुलढाण्यात दोन तरुणांनी जीवन संपवलं

SCROLL FOR NEXT