मुंबई

सानपाडा परिसरात मोबाईल फोन स्नॅचींग करणाऱया लुटारुंनी धुमाकूळ

CD

सानपाडा परिसरात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : सानपाडा परिसरात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी महागडे मोबाईल हिसकावून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे.
पाम बीच रोडकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी (ता. २१) रात्रीच्या सुमारास अनुराग सेन त्यांच्या पत्नीसोबत शतपावली करीत होते. याच वेळी एका दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी अनुराग यांच्या हातातील ५० हजारांचा मोबाईल खेचून पलायन केले. तर, सोमवारी (ता. २०) सानपाडा सेक्टर १७ मधील द अफेअर्स बिल्डिंगसमोर शिवम महाराणा हे मोबाईलवर बोलत असताना दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी शिवमला धक्का देऊन खाली पाडले व मोबाईल घेऊन पसार झाले. या दोन्ही घटनांनंतर सानपाडा पोलिसांनी चोरट्यांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

Pali News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित; सोमवारपासून कार्यालये गजबजणार

Nagpur News : शाळेत विद्यार्थिनींना शिक्षिकेकडून अमानुष मारहाण; शिक्षिकेसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Nagpur Crime : अजनीत धक्कादायक प्रकार! वडिलांकडून मुलावर चाकू हल्ला

Dimbhe Dam Issue : डिंभे धरणाच्या गळतीबाबत दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने १७१ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT