कोपरखैरणे स्थानक परिसरातील बेघरांवर पालिकेची कारवाई
साहित्य जप्त करून डम्पिंग ग्राऊंडवर हलवले; पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप कायम
वाशी, ता. २२ (बातमीदार)ः कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात वाढलेल्या बेघर नागरिकांच्या समस्येवर नवी मुंबई महापालिकेकडून २१ तारखेला कारवाई करण्यात आली. स्थानक परिसरात तात्पुरते वास्तव्यास असलेल्या बेघरांचे साहित्य जप्त करून ते कोपरखैरणे येथील डम्पिंग ग्राऊंडवर हलवण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरिकांच्या वावरास अडथळा निर्माण करणाऱ्या समस्यांवर काही प्रमाणात तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा झाली होती. काही सदस्यांनी शहरातील वाढत्या बेघरांमुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, अतिक्रमण आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. प्रशासनाने या सूचनांची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई सुरू केली.
या मोहिमेत बेघरांनी उभारलेली तात्पुरती निवारे हटवण्यात आली असून संबंधित नागरिकांना घणसोली येथील निवारा केंद्रात स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणे मोकळी होत असली तरी बेघरांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.