नेरूळमधील वाढत्या असुरक्षिततेविरोधात साकडे
(नेरूळमधील कायदा-सुव्यवस्था धोक्यात)
शिवसेनेकडून महापालिका, पोलिस आयुक्तांना निवेदन
व्यसनाधीनांचा उपद्रव, अस्वच्छता व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नेरूळ, ता. २२ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर २८ (जुना) आणि सेक्टर ३० (नवीन) परिसरात वाढलेल्या व्यसनाधीनांच्या उपद्रवामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, या गंभीर समस्येवर तत्काळ उपाय करण्याची मागणी करण्यात आली आहे. सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त, नवी मुंबई पोलिस आयुक्त तसेच नेरूळ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे या परिसरातील मोकळ्या भूखंडांवर व्यसनाधीन व्यक्तींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गांजासेवन, मद्यपान आणि इतर बेकायदा कृत्ये उघडपणे सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः महिला, तरुणी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीच्या वेळी आरडाओरड, भांडणे आणि संशयास्पद हालचाली वारंवार दिसून येतात.
या पार्श्वभूमीवर नेरूळ पोलिस ठाण्यामार्फत नियमित गस्त वाढवून कडक कारवाई करणे, संबंधित भूखंडांची तत्काळ स्वच्छता मोहीम राबविणे, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, अंधाऱ्या भागात स्ट्रीट लाइट्स बसवणे किंवा दुरुस्ती करणे, मोकळ्या जागांना फेन्सिंग करून अनधिकृत प्रवेश रोखणे तसेच व्यसनमुक्त परिसर असे सूचना फलक लावण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
महापालिका आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून परिसर सुरक्षित करावा तसेच आवश्यक असल्यास महिला सुरक्षा पथकाची नेमणूक करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष न दिल्यास नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा नामदेव भगत यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.