मुंबई

फटाका कारखान्यातील स्फोटा प्रकरणी चार जणांना अटक

CD

स्फोटप्रकरणी चार जणांना अटक
कोनसई गावातील घटनेप्रकरणी वाडा पोलिसांची कारवाई

वाडा, ता. २२ (बातमीदार) ः कोनसई गावाच्या आडबाजूला एका खासगी जागेत पत्र्याच्या शेडमध्ये अवैध फटाका कारखान्यात मंगळवारी (ता. २१) स्फोट झाला. यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले होते. याप्रकरणी वाडा पोलिसांनी चार जणांना मंगळवारी मध्यरात्री अटक केली.
कंपनीचा मालक नरेंद्र सिंग त्याचा साथीदार श्रीपद यादव, सुपरवायझर योगेश मोकाशी व जमीन मालक वसंत नाईक यांना काल मध्यरात्री वाडा पोलिसांनी अटक केली. त्यांना वाडा न्यायालयात हजर केले असता २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. कोनसई गावातील वसंत नाईक यांच्या मालकीच्या जागेत शेड उभारून नरेंदर सिंग आणि श्रीपद यादव यांनी काही महिन्यांपूर्वी सुतळी बाॅम्ब बनविण्याचा कारखाना सुरू केला होता. या कारखान्यात मृत भावेश वावर, मोनिका पडवळे यांच्यासह ३३ महिला रोजंदारीवर काम करीत होत्या. मंगळवारी (ता. २१) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कामगार भावेश हा सुतळी बाॅम्बसाठी लागणाऱ्या दारूचे मिश्रण तयार करत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात त्याचा जागीच त्याचा मृत्यू झाला, तर महिला कामगार मोनिका पडवळे या गंभीरीत्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर मोनिका जाधव, जागृती गवते, प्रतिभा पवार, अर्चना मिसाळ, जयश्री गरळ या जखमी असून त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. यादव शेखरे यांनी दिली.
कोनसई येथील एका लोखंडी शेडमधील एका भागात सुतळी बाॅम्बकरिता आवश्यक असलेल्या रासायनिक दारूचे मिश्रण तयार केले जात असे. मृत कामगार आपल्या हाताने ही दारू तयार करीत असे. तर, बाजूच्या जागेत महिला कामगार बाॅम्ब बनविण्याकरिता एका डबीत ही दारू भरून सुतळ गुंडाळण्याचे काम करीत असत. त्यानंतर हे सुतळी बाॅम्ब तालुक्यातील आब्जे आणि निचोळे येथे पॅकिंगकरिता पाठवले जात असत. या कारखान्यासाठी मालकाने कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर परवानग्या घेतल्या नसल्याने नियम धाब्यावर बसवून विनापरवाना सुरू केलेला फटाका कारखाना कामगारांच्या जीवावर बेतला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी एस. एस. मेहेर करीत आहेत.
----
गोपनीय विभाग करतोय काय?
कोनसई येथे अनेक महिन्यांपासून हा कारखाना विनापरवाना सुरू असताना वाडा पोलिसांना याबाबतची साधी माहितीही नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माहिती नसावी की अर्थपूर्ण व्यवहारामुळे ते याकडे डोळेझाक करीत होते, अशी चर्चा नागरिकांत सुरू असून पोलिसांचा गोपनीय विभाग करतोय काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT