मुंबई

उल्हासनगर विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार

CD

उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर अश्विनी निकम यांच्या उच्चस्तरीय बैठकीत शहराच्या भविष्याला दिशा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर शिक्कामोर्तब होत असल्याने, विकासाला नवा वेग मिळणार आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक टप्पा गाठत महत्त्वपूर्ण नियोजनाला गती देण्यात येत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर अश्विनी निकम यांनी विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. या वेळी शिवसेना गटनेते अरुण आशान व कमलेश निकम उपस्थित होते. बैठकीत नागरिकांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करत पाच नवीन उद्याने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. शहर अधिक सुंदर, सक्षम आणि प्रगत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. खासदार कार्यालयात रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

मूलभूत विकासावर भर
ऑन-सोर्स प्रकल्प सुरू करून स्थानिक रोजगार निर्मितीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला. आधुनिक व्हेजिटेबल मार्केट उभारणीसह शिक्षण क्षेत्रात सर्व शाळा इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. एमएमआरडीए अंतर्गत रस्त्यांच्या विकासकामांचे नियोजनही करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: होर्मुझमध्ये कडक नाकाबंदी; तरीही सुटका! जहाजांचे कॅप्टन इराण आणि अमेरिकेला कसा चकवा देतायेत? ५ गुप्त मार्ग उघड

MI vs CSK Live : संजू सॅमसनचे खणखणीत शतक! मुंबई इंडियन्सवर पडला भारी, IPL 2026 मधील 'Chetta'ची दुसरी Century

US Iran Tensions : युद्ध पुन्हा भडकणार? हॉर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी उडवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन नौदलाला आदेश

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

SCROLL FOR NEXT