भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प मार्गी
वाढीव खर्चासह भुयारी मार्ग : आमदार शेख
भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) ः बहुप्रतीक्षित ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्प पाचअंतर्गत भिवंडी-कल्याण या उर्वरित मार्गिकेस अखेर सरकारने अधिकचा निधी मंजूर करून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासंबंधीचे शासन आदेश बुधवारी (ता. २२) मंत्रिमंडळाच्या उपसमिती बैठकीत देण्यात आल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई येथे ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग ५ प्रकल्पातील टप्पा क्रमांक दोनमधील धामणकर नाका ते दुर्गाडी चौक व मेट्रो प्रकल्प ५ अ मधील दुर्गाडी-आधारवाडी-खडकपाडा-कल्याण आणि भोईरवाडी-उल्हासनगर या विस्तारित प्रकल्पाच्या अंमलबजावणी करण्यास सुधारित किमतीस मान्यता देण्याबाबत बैठक घेण्यात आली. ठाणे भिवंडी या पहिल्या टप्प्यात ११.९०० किमी अंतरात सहा स्थानके असून त्यासाठी ६,७४१ कोटी ३४ लाख तर त्यापुढील धामणकर नाका ते दुर्गाडीदरम्यानच्या १०.४७५ किमी अंतरात धामणकर नाका ते साईबाबा नाक्यादरम्यान भुयारी मार्ग असून त्यामध्ये एकूण सहा स्थानकांपैकी एक स्थानक भुयारी मार्गावर असणार आहे. या प्रकल्पासाठी ७,३२६ कोटी १३ लाख खर्च केले जाणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पाला मान्यता देताना ८,४१६ कोटी ५१ लाख रुपये खर्च केले जाणार होते; परंतु कालावधी वाढल्याने अतिरिक्त खर्च केले जाणार आहेत.
या प्रकल्पासाठी आम्ही सुरुवातीपासून आग्रही होतो. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असून भिवंडीत भुयारी मेट्रो उभारली जात असतानाच या मार्गावर अरुंद उड्डाणपूल काढून चार पदरी उड्डाणपूल उभारले जाणार असल्याने या मार्गावर पालिका प्रशासनाकडून लवकरच रस्ता रुंदीकरण केले जाणार असल्याचे आमदार रईस शेख यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.