मुंबई

विद्यार्थ्यांना विदेशात नोकरीची संधी

CD

विद्यार्थ्यांना विदेशात नोकरीची संधी
पॉलिटेक्निकच्या दहा हजार जणांना प्रशिक्षण देणार

मुंबई, ता. २२ ः राज्यातील विविध महाविद्यालयांतून पॉलिटेक्निकची पदविका घेतलेल्या आणि सध्या अंतिम वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जर्मनी, जपान व रशिया या देशांमध्ये थेट नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी आज महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
याअंतर्गत पहिल्या टप्प्यात एक हजार, तर दुसऱ्या टप्प्यात चार हजार आणि तिसऱ्या टप्प्यात तब्बल १० हजारांहून अधिक उमेदवारांना परदेशातील नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी कौशल्य उत्कृष्टता केंद्रामार्फत महाराष्ट्र-जर्मनी- जपान कुशल कामगार गतिशीलता उपक्रमासाठी अंमलबजावणी व उद्योग समन्वय भागीदार म्हणून कार्य करणार आहे. करारानुसार प्रशिक्षण, मार्गदर्शन व कौशल्य समन्वय साधला जाणार असून यासाठी राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे उपक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यासाठी समन्वय साधला जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना जर्मन, जपान आदी देशांतील भाषा, तेथील लोकव्यवहार, भाषिक व्यवहार आदींचे ज्ञान देण्यासाठी १ ते सहा महिन्यांचे खान प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम जर्मनी, जपानच्या व्यावसायिक मानकांशी सुसंगत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्याशी सुसंगत प्रमाणपत्रही बहाल केले जाणार आहे.
...
असे असतील टप्पे
पहिल्या टप्प्यात पायलट प्रकल्प म्हणून जर्मनीतील मागणीनुसार ५०० ते एक हजार विद्यार्थ्यांना २-३ प्राधान्य क्षेत्रांमध्ये संधी दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात तीन ते चार हजार उमेदवार तयार केले जातील आणि चौथ्या टप्प्यात परदेशातील नोकऱ्यांसाठी दरवर्षी १० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष केंद्रित केले जाईल.
..
भाषा प्रशिक्षणावर भर
जर्मनी, जपान व रशिया या देशांमध्ये त्या देशातील भाषांचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. या देशामध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी असून स्थानिक भाषेचे मूलभूत ज्ञान असल्यास रोजगाराच्या संधी लक्षणीयरीत्या वाढतात. भाषा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कामकाज संस्कृतीशी जुळवून घेण्याची क्षमता, संवाद कौशल्ये व व्यावसायिक आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT