मुंबई

बदलापूरात महाराजांवरील वक्तव्याने संतापाचा

CD

शिवाजी महाराजांसमाेर तरुणीचे लाेटांगण

वादग्रस्त व्‍हिडिओनंतर नागरिकांचा उद्रेक

बदलापूर, ता. २२ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल समाजमाध्यमावर अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या बदलापूर येथील २५ वर्षीय तरुणीला बुधवारी (ता. २२) नागरिकांनी महाराजांच्या पुतळ्यासमाेर लाेटांगण घालून माफी मागायला लावली. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण हाेते. याप्रकरणी तरुणीविरोधात बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिमेतील गांधीनगर परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा संबंधित व्हिडिओ आज सकाळी व्‍हायरल झाल्यानंतर शिवप्रेमी संघटना आणि स्थानिक महिलांनी तिच्या घरासमोर आंदाेलन करून निषेध नोंदवला. त्यानंतर तिला परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ नेऊन माफी मागायला लावली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.
-------
तरुणी सुशिक्षित असून तिने जाणीवपूर्वक अवमान केला आहे. पोलिस प्रशासनाने तत्काळ तिच्यावर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी अन्यथा बदलापुरातील शिवप्रेमी महिला आणि संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील.
- अर्चना सरूडकर, शिवप्रेमी
------
तरुणीवर कठोर कारवाई करून प्रशासनाने समाजासमोर ठोस उदाहरण ठेवावे अन्यथा अशा प्रवृत्तीला आळा बसणार नाही. कठाेर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू.
- संगीता चेंदवणकर, शिवप्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT