मुंबई

देखभालीच्या खर्चावरून प्रशासन धारेवर

CD

देखभालीच्या खर्चावरून प्रशासन धारेवर
‘स्थायी’तील प्रस्ताव राखीव

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईतील जलवाहिन्यांच्या शेजारी सायकल ट्रॅक, उद्यान साकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, जलवाहिन्यांशेजारी अतिक्रमण झाले असून ना उद्यान ना सायकल ट्रॅक तरी देखभालीचा खर्च सात कोटी, अशा शब्दांत स्थायी समितीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
जलवाहिन्यांशेजारी सायकल ट्रॅक, उद्यान साकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे; मात्र जलवाहिन्यांशेजारी अतिक्रमण झाले आहे. तरीही प्रशासनाने देखभालीसाठीचा प्रस्ताव आणला आहे. प्रशासन दिशाभूल करत आहे, असा आरोप स्थायी समिती सदस्या दीपमाला बढे यांनी केला. सायकल ट्रॅकच्या नावाखाली लोकांना विस्थापित केले, सायकल ट्रॅक का नाही याचा अहवाल मागवा, अशी मागणी राखी जाधव यांनी या वेळी केली. वाकोला पाईप लाइन येथे लोकांच्या घरावर कारवाई केली आणि आता १८ किलोमीटरसाठी सात कोटींचा प्रस्ताव आणता, असा हल्लाबोल ट्युलिप मिरांडा यांनी केला. सायकल ट्रॅक नाही, उद्यान नाही मग देखभालीचा प्रस्ताव का आणला, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केल्याने स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रस्ताव राखून ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT