‘मूलभूत सुविधांवर भर द्या’
विरार (बातमीदार) ः वसई-विरार पालिका प्रशासनाने लोकाभिमुख, पारदर्शक कारभार करावा, अशी करदात्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी धोरण आखण्याची मागणी ठाकरे गटाकडून पालिका आयुक्तांकडे केली आहे. नालासोपारा पूर्वेतील मजेठिया पार्क येथील नाट्यगृह १४ वर्षांपासून अपूर्णास्थेत आहे. याशिवाय सातिवलीतील अरुंद रस्ते, खेळाच्या मैदानांवर प्रशिक्षण केंद्रांचा अभाव, दुर्गंधी नियंत्रणासाठी फवारणी तसेच बेकायदा बांधकामांसारख्या मुद्द्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या बैठकीला माजी आमदार विलास पोतनीस, जिल्हाध्यक्ष प्रथमेश राऊत, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण म्हाप्राळकर, माजी नगरसेविका किरण चेन्दवणकर, लोकसभा संघटक जनार्दन म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेता विनायक निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.