कामगार संघटनांमध्ये संताप
ठेका कर्मचाऱ्यावरील कारवाईवरून आक्रमक
विरार, ता. २३ (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेत ठेका कर्मचाऱ्याला मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण कामामध्ये हलगर्जी केल्याच्या कारणावरून कामावरून कमी करण्यात आले आहेत. याविरोधात कामगार संघटनांनी पालिकेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वसई-विरार पालिकेमध्ये ठेक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणाचे काम करण्याकरिता नियुक्त केले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बीएलओची कामे करीत आहेत. या कामाचा कोणताही मोबदला वा भत्ता दिला जात नाही. राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन आठ वर्षांपासून याबाबतचा पत्रव्यवहार करत आहेत. आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करूनही भत्ता मिळाला नसल्याने कामगार संघटना आक्रमक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.