सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : उपवन तलाव परिसरात वाढलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि विठ्ठल मूर्तीच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या राहणाऱ्या मांसाहार खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे परिसराचे धार्मिक व सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका परिषा सरनाईक यांनी पालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उपवन तलाव परिसरात बेकायदा टपऱ्यांची संख्या वाढत आहे. शिवाय, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले दारू व गांजाच्या सेवनामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत सरनाईक यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पालिकेची कारवाई केवळ संध्याकाळपर्यंत मर्यादित राहत असून त्यानंतर पुन्हा टपऱ्या सुरू होत असल्याची तक्रार त्यांनी मांडली. या संदर्भात अनेक बैठका होऊनही ठोस कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त करत, परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर विठ्ठल मूर्तीचे स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. शहरातील इतर भागांमध्येही फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर होत असल्याची बाब समोर आली आहे. कारवाईची माहिती आधीच मिळत असल्याने संबंधित विक्रेते पळ काढतात. यामागे कोणाचा हात आहे, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कारवाईचे आश्वासन
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाला जाब विचारला. अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कारवाई वाढवण्याचे आश्वासन दिले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.