राणीशिगाव येथे शाळा पूर्वतयारी मेळावा व पोषण पखवाडा उत्साहात साजरा
वाणगाव, ता. २३ (बातमीदार) : प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन तसेच आयसीडीएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राणीशिगाव येथील अंगणवाडी केंद्रात शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी पोषण पखवाडादेखील मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश लहान मुलांच्या शैक्षणिक व शारीरिक विकासाबाबत पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता. मुलांची शाळेत जाण्याआधी पूर्वतयारी करून घेणे, त्यांचा सर्वांगीण विकास होणे हा आहे. मेळाव्यात बालकांसाठी विविध शैक्षणिक खेळ, क्रियाकलाप आणि संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले. यामधून मुलांची बौद्धिक क्षमता, भाषा कौशल्य आणि सामाजिक सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला. कार्यक्रमास सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, माता पालक, स्थानिक नागरिक तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
-----------------
आहार पद्धतीचे मार्गदर्शन
पोषण पखवाड्याच्या निमित्ताने संतुलित आहाराचे महत्त्व, पौष्टिक अन्नाचे प्रकार आणि योग्य आहार पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविका आणि कार्यकर्त्यांनी पालकांना मुलांच्या आरोग्यविषयक सवयींबद्दल माहिती दिली. या उपक्रमामुळे गावात शिक्षण आणि पोषण याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, अशा कार्यक्रमांची गरज अधोरेखित करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.