अंबरनाथ, ता. २३ (वार्ताहर) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात सध्या मतदारांचे २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. हे मॅपिंग पूर्ण न झाल्यास संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याची माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे २१ एप्रिलला झालेल्या बैठकीत मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाबाबत महत्त्वाची माहिती देताना पुरी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. या प्रक्रियेत सध्याच्या मतदार यादीतील नावांची २००२च्या यादीतील नोंदींशी पडताळणी केली जात असून, यासाठी ‘बीएलओ’मार्फत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन काम सुरू आहे. या संदर्भातील २००२ च्या मतदार याद्या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील एकूण तीन लाख ८४ हजार ६२१ मतदारांपैकी अद्याप दोन लाख २६ हजार ९८२ मतदारांचे मॅपिंग प्रलंबित आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी बीएलओ जेव्हा नागरिकांच्या घरी किंवा सोसायट्यांमध्ये भेट देतील, तेव्हा त्यांना आवश्यक माहिती व सहकार्य द्यावे, असे आवाहन पुरी यांनी केले. मतदारांनी पुढाकार घेत मॅपिंग प्रक्रिया पूर्ण केल्यास भविष्यात मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता टाळता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.