मुलुंडमध्ये तरुणीची आत्महत्या
मुलुंड, ता. २३ (बातमीदार) : मुलुंड पश्चिमेतील डॉ. आर. पी. रोड परिसरातील सिद्धार्थनगर बीएमसी वसाहतीत बुधवारी (ता. २२) सायंकाळी एका २२ वर्षीय तरुणीने इमारतीच्या २० व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणाची नोंद मुलुंड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. संबंधित तरुणी आपल्या कुटुंबासोबत १९ व्या मजल्यावर राहत होती. तिचे लग्न ठरले होते. मात्र, या विवाहाबाबत ती असमाधानी असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. गेल्या काही काळापासून ती मानसिक तणावाखाली असल्याचेही सांगण्यात आले. लग्नासंदर्भातील ताणतणावामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.