जुईनगर, ता. २३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या १४ गावांतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत गुरुवारी (ता. २३) महापालिका मुख्यालयात बैठक पार पडली. १५ मेपर्यंत सर्व हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या. तसेच गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर नागरिकांना आवश्यक सेवा देण्यासाठी ही प्रक्रिया लवकर पूर्ण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे १४ गावांतील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना गती मिळणार असून, नागरिकांना लवकरच मूलभूत सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीस महापौर सुजाता पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या बैठकीत १४ गावांतील दप्तर व मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. या वेळी नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली. जन्म-मृत्यू नोंदणी सेवा तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आरोग्यसेवा, शिक्षण व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि रस्ते दुरुस्ती व विकासकामांना प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
१४ गावांतील नागरिकांना महापालिका क्षेत्रातील इतर भागांप्रमाणे दर्जेदार व सुलभ सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्याच दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी बैठकीत नमूद केले. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सभागृह नेते सागर नाईक, नगरसेवक शशिकांत भोईर, भरत भोईर, प्रतीक्षा पाटील तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.