मुंबई

विद्यार्थ्यांकडून रेवदंडा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

CD

विद्यार्थ्यांकडून रेवदंडा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
जिंदल विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे श्रमदान
मुरूड, ता. २३ (बातमीदार) : ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने साळाव येथील जिंदल विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी रेवदंडा किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवून एक आदर्श घालून दिला. इयत्ता नववी ‘अ’ मधील ३१ विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्याच्या परिसराची स्वच्छता करत श्रमदानाचा अनोखा अनुभव घेतला.
या उपक्रमात शिक्षिका अफी बाशा आणि सुशील अभंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी किल्ल्याभोवती साचलेला प्लॅस्टिक कचरा, सुकी पाने व झुडपे साफ करून परिसर स्वच्छ केला. “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश त्यांनी कृतीतून प्रभावीपणे दिला.
या वेळी जेईटी प्रमुख डॉ. भावेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळेचे प्राचार्य मुकेश ठाकूर, उपप्राचार्य मंगेश बमनोटे तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज मलिक यांनीही विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि ऐतिहासिक ठेव्यांविषयी आदर निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT