कल्याण, ता. २३ (बातमीदार) : अचानक वाढलेल्या वीजबिलांमुळे कल्याण परिसरातील ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. विधानसभा प्रमुख नारायण पाटील यांनी महावितरणच्या कारभारावर कठोर टीका करत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
उन्हाळा सुरू होताच वीजबिलांमध्ये झालेली अचानक वाढ ही संशयास्पद असल्याचा आरोप करत, प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिले तयार केली जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पंखे, एसी किंवा कुलरमुळे वीज वापर वाढतो, हे मान्य आहे; मात्र बिल थेट दुप्पट कसे येते? असा सवाल पाटील यांनी केला. ही वाढ युनिटनुसार नसून सरसकट केल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या मागे ऊर्जा खाते आणि महावितरण यांच्यातील संगनमत तर नाही ना, अशी शंका व्यक्त करत याची सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली. वाढीव बिलांमुळे सर्वसामान्य ग्राहक आर्थिकदृष्ट्या त्रस्त झाले असून, प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अधिकाऱ्यांना भर उन्हात फिरवण्याचा इशारा
दरम्यान, याप्रकरणी योग्य तो निर्णय न घेतल्यास ठाकरे गट रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना भर उन्हात ग्राहकांच्या घरोघरी फिरवून परिस्थितीची जाणीव करून दिली जाईल, असा इशारा नारायण पाटील यांनी दिला. या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व भागात वीज बिलाचा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.