मुंबई

रबाळे टी-जंक्शनवर खोदकामामुळे तीव्र वाहतूक कोंडी

CD

रबाळे टी-जंक्शनवर खोदकामामुळे तीव्र वाहतूक कोंडी
दुरुस्ती कामांमुळे वाहनचालक त्रस्त; तासन्‌तास वाहने रांगेत
वाशी, ता. २३ (बातमीदार) : ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे रेल्वे स्थानकाजवळून रबाळे टी-जंक्शनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर सुरू असलेल्या दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावर सुरू असलेल्या खोदकामामुळे मार्ग अरुंद झाला असून, वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. परिणामी सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ९ या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत.
या कोंडीत वाहनचालकांना १५ ते २० मिनिटांपर्यंत अडकून पडावे लागत असून, दुचाकीस्वारांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी अपुरे मनुष्यबळ असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्री व मनुष्यबळ वाढवण्याची मागणी केली आहे. पर्यायी मार्गांचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे शेवटी नागरिकांनी ठामपणे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Airstrike Iran : जग युद्धाच्या उंबरठ्यावर! डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला धुडकावून इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला

Ratnagiri Monsoon Update 2026 : कोकणात पाऊस कधी जोर धरणार? रत्नागिरी-सिंधुदुर्गात 9 जूनपर्यंत अलर्ट; IMD चा नवा अंदाज, तळकोकणात मॉन्सूनची काय स्थिती?

Mumbai Marathi Schools: मुंबईतील मराठी शाळांवर संकट; ५७ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, संचमान्यता निकषांवर प्रश्नचिन्ह

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या प्रेमात मिळालेला धोका, म्हणालेले...'ती सोडून गेली नसती तर आज मी...'

SCROLL FOR NEXT