मुंबई

आगवन ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना मदत

CD

आगवन ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना मदत

तारापूर, ता. २३ (बातमीदार) : आगवन ग्रामपंचायतीमार्फत १५ टक्के मागासवर्गीय निधी आणि पाच टक्के दिव्यांग निधीच्या माध्यमातून गावातील नागरिकांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत भांड्यांचे संच वितरण आणि दिव्यांगांना आर्थिक मदत देण्यात आली.

महसूल गाव, आगवन व मोठापाडा परिसरात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुलभ व्हावेत, यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पाड्या-पाड्यांवर एकूण १९ भांड्यांचे संच वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच रूपजी कोल, ग्रामपंचायत सदस्य, तसेच माजी सरपंच दामोदर माच्छी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

याचबरोबर ग्रामपंचायतीच्या पाच टक्के दिव्यांग निधीतून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी धनादेशाच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीमुळे दिव्यांग नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. एकूणच, ग्रामपंचायतीच्या या उपक्रमांमुळे गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT