मुंबई

आपल्या विरोधातील तक्रारींची सखोल चौकशी करावी

CD

तक्रारींची सखोल चौकशी करावी
परिवहनमंत्री सरनाईक यांचे आयुक्तांना पत्र

भाईंदर, ता. २३ (बातमीदार) : आमदार नरेंद्र मेहता यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात आपल्या कंपनीच्या प्रकल्पांविरोधात झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करावी. मात्र, त्याचबरोबर आमदार नरेंद्र मेहता, त्यांच्या मालकीच्या ७/११ कंपनी, त्यांचे बंधू विनोद मेहता तसेच त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांविरोधात महापालिकेकडे प्राप्त झालेल्या सर्व प्रलंबित तक्रारींचीही तातडीने शहानिशा करावी, अशी मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार नरेंद्र मेहता यांनी बुधवारी (ता. २२) जनता दरबाराचे आयोजन केले होते. या दरबारात प्रताप सरनाईक यांचा चेणा येथील प्रकल्प तसेच मिरा रोड येथील हॉटेलविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या होत्या. संबंधित तक्रारींची शहानिशा करण्याचे आश्वासन मेहता यांनी तक्रारदारांना दिले होते. यावर प्रत्युत्तर देताना सरनाईक यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना माझ्यासंदर्भात अशा स्वरूपाच्या तक्रारी समोर येत असतील, तर त्यांची सत्यता पडताळणे आणि त्यावर तत्काळ कायदेशीर भूमिका स्पष्ट करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
मिरा-भाईंदर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रशासकीय पारदर्शकतेसाठी लोकप्रतिनिधींचे चारित्र्य व कारभार निष्कलंक असणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधीच जर अनधिकृत कृत्ये किंवा नियमबाह्य बांधकामांत गुंतलेले असतील, तर नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होऊ शकतो, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
सरनाईक यांनी आपल्या विरोधातील तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी भूमिका मांडली आहे. त्याच वेळी आमदार नरेंद्र मेहता व त्यांच्याशी संबंधित घटकांविरोधात महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या सर्व तक्रारींचीही वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच आगामी लोकदरबारापूर्वी आपल्या विरोधातील तसेच नरेंद्र मेहता व संबंधितांविरोधातील तक्रारींचा सविस्तर अनुपालन अहवाल सादर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या पत्रामुळे सरनाईक विरुद्ध मेहता वादाला नवे वळण मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT