मुंबई

सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त गुलदस्त्यात

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजपने महापालिकेचा कारभार चालवण्यास सुरू केल्यापासून अनेक आमूलाग्र बदल झाले आहेत. ५ फेब्रुवारीपासून एप्रिलमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे या सभांच्या कामकाजात घेतलेल्या निर्णयाची बेकायदा अंमलबजावणी सुरू असल्याचा दावा विरोधकांकडून होत आहे.

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर ५ फेब्रुवारीला पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. यानंतर अनुक्रमे २० मार्च आणि २० एप्रिल अशा एकूण तीन सभा एकापाठोपाठ पार पडल्या. या सभांनंतर अनेकवेळा तहकूब सभादेखील झाल्या. यादरम्यान, अर्थसंकल्प आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या प्रस्तावाकरिता काही विशेष सभादेखील महापालिकेत पार पडल्या आहेत, परंतु या सभा होऊन आतापर्यंत दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे, तरी सर्वसाधारण सभेत मंजूर झालेले प्रस्ताव, ठराव आणि त्यावर सदस्य नगरसेवकांनी केलेले वक्तव्य आणि सूचना यांचे सभागृहातील इतिवृत्ताचा लेखाजोखा सभेने मंजूर केलेला नाही.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ कायद्यान्वये सर्वसाधारण सभेतील इतिवृत्त हा दुसऱ्या दिवशी अथवा सात दिवसांपर्यंत मंजूर करण्याबाबत स्पष्टता नाही, परंतु जेवढा विलंब होईल तेवढे बेकायदा आहे, असे कायद्यात म्हटले गेले आहे. सभागृहात झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी इतिवृत्ताची दुसऱ्या सभागृहापुढे ठेवून मंजुरी घेणे गरजेचे आहे, परंतु आतापर्यंत झालेल्या एकाही सभेचे इतिवृत्त सत्ताधाऱ्यांनी सभागृहापुढे ठेवलेले नाही. इतिवृत्त सभागृहापुढे ठेवत नसल्याने सभागृहात झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी बेकायदा सुरू असल्याची चर्चा महापालिकेत आहे.

नगरसेवक किशोर पाटकर आक्रमक
शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी इतिवृत्ताबाबत सर्वसाधारण सभेत जोरदार आक्रमक पवित्रा घेतला. सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयांचे इतिवृत्त सादर करीत नाहीत. त्याला मंजुरी घेत नाहीत, अशा निर्णयांची बेकायदा अंमलबजावणी सुरू असल्याचा दावा पाटकर यांनी केला. इतिवृत्त समोर आणले का जात नाही, असा प्रश्न पाटकर यांनी उपस्थित केला. प्रशासनाने सर्वसाधारण सभेतील इतिवृत्त सादर न केल्यास आपण न्यायालयात जाऊ, असा इशाराही पाटकर यांनी प्रशासनाला दिला. तसेच जे ठराव कायम केले आहेत, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्या ठरावाची प्रत मिळत नसल्याचा आरोपही पाटकर यांनी केला.

इतिवृत्ताची गरज नाही!
सर्वसाधारण सभेत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हा प्रस्ताव कायम केला जात आहे. त्याचे इतिवृत्त देण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण सभागृह नेते सागर नाईक यांनी दिले. ज्या प्रस्तावांची अंमलबजावणी करायची आहे, ते प्रस्ताव सभागृहात कायम केले जात असल्याने ते नियमाप्रमाणे अंमलबजावणीकरिता पात्र होते, असेही नाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: विधान परिषद निवडणुकीत भाजपचा मोठा गेमप्लॅन! किती जागा लढणार? आक्रमक रणनीतीनं विरोधक चिंतेत, समीकरण काय?

Solapur Water : 4.5 कोटींच्या थकबाकीने भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ठप्प; 39 गावांचा उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर

MI vs CSK Live : रोहित शर्मा, MS Dhoni ला खेळताना पाहण्याची इच्छापूर्ती नाहीच... मुंबईने टॉस जिंकला, चेन्नईच्या ताफ्यात दोन बदल

मुमताज यांनी हिंदू मुलासोबत लग्न करायला होकार का दिला? इतक्या वर्षांनी कारण सांगत म्हणाल्या, 'आमच्या कुटुंबात...'

Iran-US War: मोटरबोटवरून पाठलाग, मास्क घालून जहाजावर चढले अन्...; इराणने होर्मुझमध्ये भारतीय जहाज कसे पकडले? पाहा थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT