मुंबई

रुग्णावाहिकेअभावी बाळंतीण मातेची फरपट

CD

रुग्णावाहिकेअभावी बाळंतीण मातेची फरपट
वाडा तालुक्यातील महिलेसोबत आरोग्य विभागाचा छळ

पालघर, ता. २३ : वाडा तालुक्यातील मांगरोळ सुतकपाडा गावात राहणाऱ्या रोशनी महेश कामडी या २४ वर्षीय स्तनदा मातेची रुग्णावाहिकेअभावी ठाणे ते वाडा अशी तब्बल सहा ते आठ तास फरपट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील असल्याने रोशनी यांना रुग्णावाहिका न दिल्याने त्यांना चक्क एसटी बसने वाडा गाठावे लागले.

रोशनी कामडी या गरोदर असल्यामुळे त्यांना वाडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने त्यांना प्रसूतीसाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवले गेले. शनिवारी (ता. १८) रोशनी यांना शस्त्रक्रियेद्वारे बाळ झाले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना व बाळाला ठाणे रुग्णालयामध्ये उपचारार्थ पाच ते सहा दिवस ठेवण्यात आले. त्यानंतर बुधवारी (ता. २२) त्यांना डिस्चार्ज दिला गेला खरा. मात्र, वाडा तालुक्यात येण्यासाठी त्यांना रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही. रुग्णवाहिकेसाठी विनवणी करूनसुद्धा ती उपलब्ध न झाल्याने चक्क उन्हातन्हात या कुटुंबाने तान्ह्या बाळासह एसटीमधून प्रवास केला. आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराचा हा नमुना असल्याचे या महिलेचे पालक सांगतात.

डिस्चार्जच्या वेळी रोशनी यांचे पती महेश यांनी १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, ही रुग्णवाहिका पालघरला जाणार नाही, ती ठाणे जिल्ह्यातच फिरते असे उत्तर मिळाले. मग महेश यांनी १०८ वर संपर्क केल्याने यात स्तनदा मातांना नेता येणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. एवढेच नाही, आपली परिस्थिती हलाखीची असून, आम्हाला भिवंडीपर्यंत तरी सोडा, असे १०२ वर संपर्क साधत महेश यांनी विनंती केली, पण त्यांचा हा प्रयत्नही यशस्वी होऊ शकला नाही.

-----
अखेर एसटीने प्रवास
काहीच साध्य होत नसल्याने महेश यांनी अखेर रोशनी व आपल्या नवजात बाळाला रिक्षा करून रेल्वे स्थानकापर्यंत आणले. तिथे गेले असता, ट्रेनला असलेली भरपूर गर्दी पाहता त्यांनी एसटीने जाण्याचा निर्णय घेतला. ठाणे स्थानकातून ते वाड्याच्या दिशेने निघाले व रात्री उशिरा आपल्या परिसरात दाखल झाले.
-------------
नीलम गोऱ्हे यांना निवेदन
महेश यांनी आपल्यासोबत झालेला सर्व प्रकार गुरुवारी (ता. २३) पालघर जिल्ह्यावर असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना सांगितला. या प्रकाराबाबत श्रमजीवी संघटनेनेही गोऱ्हे यांना निवेदन दिले असून, आरोग्य व्यवस्था सुधारण्याची मागणी केली. या प्रकरणात सखोल चौकशी करून आरोग्य व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्र्यांना सूचित करू, असे आश्वासन गोऱ्हे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: मोटरबोटवरून पाठलाग, मास्क घालून जहाजावर चढले अन्...; इराणने होर्मुझमध्ये भारतीय जहाज कसे पकडले? पाहा थरारक व्हिडिओ

Video Viral: पाकिस्तानी गोलंदाजाने आज मार खाल्लाच असता... फलंदाजाने बॅट उगारली, दोघांनी अडवले नाहीतर घडला असता अनर्थ...

7th Pay Commission: 'या' कर्मचाऱ्यांची चांदी! ७ व्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; योगी सरकारकडून पगारवाढीचं मोठं 'गिफ्ट'!

बदमाश पाकिस्तानी ! Mohsin Naqvi ने पत्रकाराला किडनॅप केले? PCB प्रमुखावर गंभीर आरोप, एका Video ने जगभरात खळबळ

State Cooperative Bank Profit: सामाजिक बांधिलकीसह आर्थिक बळकटी; राज्य सहकारी बँकेचा नफा ७०२ कोटींवर, सहकार क्षेत्रासाठी नवा आदर्श

SCROLL FOR NEXT