कॉसप्ले कम्युनिटी वर्कशॉपमध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रभादेवी, ता. २३ (बातमीदार) : मुंबईतील कॉसप्ले कम्युनिटीने आपले कौशल्य अधिक परिपूर्ण करण्यासाठी ‘कॉसप्ले १०१’ या विशेष वर्कशॉपचे आयोजन केले होते. यात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कॉमिक कॉन इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे प्रात्यक्षिक वर्कशॉप नुकतेच पार पडले. या कार्यक्रमात १५० हून अधिक युवकांनी सहभाग घेत शिकण्याचा परिपूर्ण अनुभव घेतला. या वर्कशॉपमध्ये ‘इंडियन चॅम्पियनशिप ऑफ कॉसप्ले’चे दोन वेळा विजेते झालेले अक्षय चुरी यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत कॉसप्ले आर्टिस्ट तेजल मुलिक आणि जीत मोलांकर यांनीही मार्गदर्शन केले. या सत्रामध्ये सहभागींना कॉसप्लेची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.
योग्य कॉस्ट्यूम निवडण्यापासून साहित्य गोळा करणे, टेक्सचर डिटेलिंग शिकणे आणि पूर्ण कॅरेक्टरमध्ये रूपांतर कसे करायचे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. याशिवाय कॉस्ट्यूम तयार करणे, फोमपासून प्रॉप्स बनवणे, प्रोफेशनल व्हीएफएक्स मेकअप आणि विग स्टायलिंग यांसारख्या तांत्रिक बाबींवरही सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.