मुंबई

नाशिकच्या सैनिकी शाळेतून दोघींची एनडीएसाठी निवड

CD

नाशिकच्या सैनिकी शाळेतून दोघींची एनडीएसाठी निवड
मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक
मुंबई, ता. २२ : नाशिक येथील राज्य सरकारच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून दोन मुलींची राष्ट्रीय संरक्षण अकादमीसाठी (एनडीए) निवड झाली आहे. देशपातळीवरील गुणवत्ता यादीत जिया करपे हिने दुसरा, तर समृद्धी इंगळे हिने १५वा क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मंत्रालयात सत्कार करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२१ला मुलींना एनडीएमध्ये प्रवेश देण्याची घोषणा केल्यानंतर नाशिक येथे १८ जून २०२३ला मुलींना सैनिकी प्रशिक्षण देणारे पहिले सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. या संस्थेसाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेतला होता. या संस्थेत अकरावी, बारावीच्या विद्यार्थिनींना दोन वर्षांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळवत संस्थेतील दोन मुलींची देशपातळीवर निवड झाल्याने त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या संस्थेत मुलींच्या या प्रशिक्षण केंद्रातून या संस्थेत अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींना दोन वर्षांचा विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम दिला जातो. एनडीएसाठी निवड झालेल्या दोन्ही मुली या सातारा जिल्ह्यातील असून, यातून या जिल्ह्याचाही मोठा सन्मान वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

--
कोट
नाशिकमध्ये शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून मागील वर्षी हंसिका टिल्लू हिची आणि यंदा जिया करपे, समृद्धी इंगळे या दोन मुलींची देशपातळीवर निवड झाली, ही मोठी अभिमानास्पद बाब आहे. भविष्यात राज्यातील अधिकाधिक मुलींची एनडीएमध्ये निवड होण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी शालेय स्तरावरून मुलींना अधिकाधिक प्रोत्साहित करण्यासाठीही आमचे प्रयत्न असतील.
- दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Astronomers: भारतीय संशोधकांचा मोठा शोध! प्राचीन तारासमूहांमध्ये पाच नवीन न्यूट्रॉन तारे सापडले, आकाशगंगेच्या गर्भात दडलेले रहस्य उलगडले..

Soldier Martyred: मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचे स्वप्न अपुरेच! १५ दिवसांवर असताना उरीत जवान अर्जुन जाधव हुतात्मा, बाबा येणार होते घरी...

Latest Marathi News Live Update : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आज 'कॉक्रोच जनता पार्टी'चे आंदोलन

जगबुडी नदीत बुडून तीन भावांचा अंत, मुंबईतील कुटुंबावर काळाचा घाला; काठावर दोन भाऊ हताश

Amethi Samosa : ट्रेन थांबताच प्रवाशांची तुटून पडणारी गर्दी! फक्त समोशांवर GST भरणाऱ्या त्रिवेदी परिवाराने ४४ वर्षांपासून कशी जपली 'शटल एक्सप्रेस'ची चव?

SCROLL FOR NEXT