मुंबई

तुर्भे ट्रक टर्मिनल धोक्यात

CD

तुर्भे ट्रक टर्मिनल धोक्यात
ज्वलनशील साठ्यांमुळे आगीची भीती; प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : तुर्भे ट्रक टर्मिनल परिसरात पुन्हा एकदा ज्वलनशील वस्तूंची अनधिकृत गोडाऊन उभारण्यात आल्याने मोठ्या आगीचा धोका निर्माण झाला आहे. प्लॅस्टिक कॅरेट, कागदी पुठ्ठे आणि इतर ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवले जात असून, सिडको आणि महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
विशेष म्हणजे, जुलै महिन्यात याच ट्रक टर्मिनलमध्ये अशाच प्रकारच्या गोडाऊनमध्ये भीषण आग लागून आठ ट्रक आणि एक जेसीबी खाक झाले होते. त्या घटनेत जीवितहानी टळली असली तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेनंतर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी टीका होत आहे.
तुर्भे ट्रक टर्मिनलच्या अगदी शेजारीच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा बीएआरसी प्रकल्प असल्याने या परिसरातील आगीचा धोका अधिक गंभीर ठरतो. अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे पूर्वीची आग आटोक्यात आली होती; अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. सध्या आंबा हंगामामुळे पुठ्ठ्याचे बॉक्स आणि प्लॅस्टिक कॅरेटचा साठा वाढला असून, त्याचाच फायदा घेत पुन्हा ज्वलनशील वस्तू साठवली जात असल्याचा आरोप होत आहे.

कोट :
परिसरातील सर्व ज्वलनशील साहित्य तत्काळ हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत अन्यथा महापालिकेकडून नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- सागर मोरे, सहाय्यक आयुक्त, तुर्भे विभाग

राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर धोका
तुर्भे ट्रक टर्मिनलच्या शेजारी असलेला बीएआरसी प्रकल्प देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा संवेदनशील परिसरात ज्वलनशील वस्तूंचा साठा होणे ही केवळ स्थानिक समस्या नसून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याचे परिणाम दूरगामी ठरू शकतात. त्यामुळे अनधिकृत गोडाऊन तत्काळ हटवून संबंधितांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT