मुंबई

लाचखोर उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड अखेर निलंबित

CD

महापालिका मुख्यालयातील लाचप्रकरणी
उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड निलंबित

नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेतील लाचप्रकरणी अटक करण्यात आलेले अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. कंत्राटदाराचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले होते. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अतिक्रमण विभागातील एका कंत्राटदाराची प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी डॉ. गायकवाड यांनी पैशांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर मंगळवारी (ता. २१) पालिका मुख्यालयातील त्यांच्या दालनात सापळा रचण्यात आला. त्या वेळी ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
अटकेनंतर डॉ. गायकवाड यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास एसीबीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवारी (ता. २२) त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढले.
निलंबन कालावधीत डॉ. गायकवाड यांचे मुख्यालय सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे राहणार आहे. आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबन काळात खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT