‘भारत टॅक्सी’ सेवा आता मुंबईतही
५०० ऑटो-टॅक्सीचालक, युनियनचा सहभाग
मुंबई, ता. २३ ः ‘सहकारातून समृद्धी’ या दृष्टिकोनातून फेब्रुवारीत सुरू करण्यात आलेली ‘भारत टॅक्सी’ सेवा आता मुंबईतही सुरू झाली. त्याच्या ऑटो व कॅब ड्रायव्हर ऑनबोर्डिंग आणि ॲपचे उद्घाटन नुकतेच मुंबईत झाले. या उपक्रमामुळे भाडेतत्त्वावर ऑटो व कॅबचालकांना ‘मालक’ बनण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत कांदिवली येथे झालेल्या कार्यक्रमास ५०० हून अधिक ऑटो व कॅबचालक, वाहतूक संघटना आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पीयूष गोयल यांनी ‘भारत टॅक्सी’ हा परिवर्तनवादी उपक्रम असल्याचे म्हटले. यामध्ये चालक केवळ सेवा पुरवठादार नसून ते भागीदार आणि मालकही आहेत. फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू झाल्यानंतर या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या दररोज २५ हजारांहून अधिक प्रवाशांपर्यंत वाढ झाली आहे. लहान स्वरूपात सुरू झालेला हा उपक्रम आता चळवळ बनत आहे. ‘भारत टॅक्सी’ भविष्यात उबर, रॅपिडोसारख्या प्लॅटफॉर्मनाही मागे टाकू शकते. या सेवेसाठी पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय म्हणून ई-वाहनांचा वापर वाढवण्यावर त्यांनी भर दिला. सीएनजी वाहनांच्या तुलनेत ई-वाहनांचा चालवण्याचा खर्च कमी असल्याने चालकांच्या उत्पन्नात वाढ होते, असे गोयल म्हणाले.
----
‘भारत टॅक्सी’चालकांना सुविधा :
- पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण
- परवडणाऱ्या कर्जांची सुविधा
- मुद्रा कर्जासारख्या योजनांचा लाभ
---
सेवेचा विस्तार
- नोंदणीकृत चालक : ५.१७ लाख
- ग्राहक संख्या : ५० लाखांहून अधिक
- कार्यक्षेत्र : दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, गुजरात, चंडीगड, लखनौ आणि आता मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.