मुंबई

ड्रग्‍जमुक्‍त मुंबई अभियान राबवण्याची मागणी

CD

ड्रग्‍जमुक्‍त मुंबई अभियान राबवण्याची मागणी
राष्‍ट्रवादीचे गृहराज्‍यमंत्र्यांना निवेदन
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः शहरात वाढत चाललेल्या ड्रग्ज व्यापाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष डॉ. अमोल मातेले यांनी शुक्रवारी (ता. २४) गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रालयात भेट घेतली. या वेळी त्यांनी ड्रग्जविरोधी ठोस कारवाईसाठी सविस्तर निवेदन सादर केले.
महाविद्यालयीन युवकांना लक्ष्य करून वाढत असलेल्या नशेखोरीच्या घटनांबाबत डॉ. मातेले यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. गोरेगाव येथील नेस्को परिसरातील ड्रग्ज पार्टी प्रकरण, विक्रोळीतील कारवाया तसेच ओव्हरडोसच्या वाढत्या घटनांमुळे तरुणांचे आयुष्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
मुंबईत तत्काळ ‘ड्रग्जमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याची मागणी त्यांनी केली. या मागणीची दखल घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या सोमवारी या विषयावर सविस्तर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या भेटीदरम्यान मुंबई युवक सरचिटणीस रोहित सावंत, शैलेंद्र बैस, इमरान तडवी, जिल्हाध्यक्ष मयूर केनी, चारकोप तालुका अध्यक्ष नवनाथ सपकाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

Pali News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित; सोमवारपासून कार्यालये गजबजणार

Nagpur News : शाळेत विद्यार्थिनींना शिक्षिकेकडून अमानुष मारहाण; शिक्षिकेसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Nagpur Crime : अजनीत धक्कादायक प्रकार! वडिलांकडून मुलावर चाकू हल्ला

Dimbhe Dam Issue : डिंभे धरणाच्या गळतीबाबत दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने १७१ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT