मुंबई

विना शस्त्रक्रिया उपचाराच्या नावाखाली भोंदू डॉक्टरने वृद्धाकडून ५ लाख रुपये उकळले

CD

गुडघेदुखीवर विना शस्त्रक्रिया उपचाराचा बहाणा
डॉक्टरने वृद्धाला पाच लाखांना लुटले
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : गुडघेदुखीवर विना शस्त्रक्रिया उपचार करण्याच्या बहाण्याने एका डॉक्टरने ७९ वर्षीय वृद्धाकडून पाच लाख रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाशी पोलिसांनी तथाकथित डॉ. मयूर पुनावाला याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार सतीशकुमार (वय ७९) हे वाशी सेक्टर २८ मध्ये राहण्यास आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये विलेपार्ले येथे ते गेले असताना, त्यांची भेट अनिल जैन नावाच्या एका व्यक्तीशी झाली होती. जैन याने सतीशकुमार यांच्या गुडघेदुखीबाबत विचारपूस केली. त्यानंतर त्याने डॉ. मयूर पुनावाला हे विना शस्त्रक्रिया गुडघेदुखीवर उपचार करतात, असे सांगून त्यांचा संपर्क क्रमांक दिला होता.
९ डिसेंबर २०२५ रोजी पुनावाला याने सतीशकुमार यांच्या घरी भेट दिल्यानंतर त्याने एका शंखुसारख्या साधनाचा वापर करून त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर उपचार करण्याचा बहाणा केला. तसेच शंखाद्वारे गुडघ्यातून १०० वेळा हवा ओढून काढल्याचे भासवून तब्बल सात लाख रुपयांचे बिल आकारले. त्यानंतर आयकर वाचवून देतो असे खोटे आश्वासन देऊन त्याने सतीशकुमार यांच्याकडून पाच लाख रुपये उकळले.
डॉक्टरने केलेल्या उपचारानंतरही सतीशकुमार यांचे दुखणे थांबले नाही, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बुधवारी (ता. २२) वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून डॉक्टरचा शोध सुरू केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव रूपवते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

Sonvi Bridge Accident in Sangameshwar : सोनवी पुलावर दोन ट्रकची धडक; एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतुकीचा फटका; महामार्गावर वाहनांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Mumbai Rain Update: इस्ट टू वेस्ट! वाहतूक कोंडीने मुंबईकर त्रस्त; रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

SCROLL FOR NEXT