मुंबई

मराठी सक्ती मागे घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

CD

कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : ‘मराठी सक्ती मागे घ्या’ अशी मागणी करणाऱ्या रिक्षाचालक, मालक व त्यांच्या नेत्यांवर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करावेत; अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देत विविध मागण्या केल्या.
ठाकरे गटाच्या वतीने गुरुवारी (ता. २३) कल्याण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर शिष्टमंडळाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात रिक्षाचालकांनी मराठी भाषेचा वापर करावा, मराठीचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, रिक्षा स्टँडची संख्या वाढवावी, स्कूल बसमध्ये महिला मदतनीस अनिवार्य कराव्यात, वर्षातून चार वेळा बस तपासणी करावी, अवैध रिक्षांवर कारवाई करावी, स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी दूर करावी; तसेच मीटरप्रमाणे रिक्षा सेवा सुरू करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. अन्यथा कायदेशीर मार्गाने न्यायालयात जाण्याचा इशाराही विजय साळवी यांनी दिला. या निवेदनावर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी, निवेदनानुसार कायद्याप्रमाणे आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक
मीटरप्रमाणे रिक्षा चालवण्याचे आदेश असतानाही त्याचे पालन होत नाही. याला परिवहन विभागाची निष्क्रियता कारणीभूत आहे. युनियनच्या दबावाखाली अधिकारी काम करत आहेत. तसेच त्यांनी कल्याण शहरात परवानगीशिवाय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत आहे, असे विजय साळवी यांनी सांगितले. शाळा बसच्या सुरक्षेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत प्रत्येक बसमध्ये महिला मदतनीस अनिवार्य करण्याची मागणी केली. अन्यथा बदलापूरसारख्या घटना घडण्याचा धोका आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

Pali News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित; सोमवारपासून कार्यालये गजबजणार

Nagpur News : शाळेत विद्यार्थिनींना शिक्षिकेकडून अमानुष मारहाण; शिक्षिकेसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Nagpur Crime : अजनीत धक्कादायक प्रकार! वडिलांकडून मुलावर चाकू हल्ला

Dimbhe Dam Issue : डिंभे धरणाच्या गळतीबाबत दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने १७१ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT