मुंबई

‘आपत्कालीन’चा कैवारी कोण?

CD

भिवंडी, ता. २४ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या प्रशासनाची निष्काळजी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. महापालिकेचा आपत्कालीन विभाग जवळपास दोन महिन्यांपासून कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याच्या नेतृत्वाविनाच कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यात काही आपत्कालीन घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. या विभागाच्या महत्त्वाच्या पदावर स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी होत आहे.

भिवंडी पालिकेच्या कार्यक्षेत्रात शेकडो यंत्रमाग कारखाने, डाईंग कंपन्या व मोती कारखाने आहेत. तसेच अवैधरीत्या रासायनिक द्रव्य आणि पदार्थांची साठवणूक केल्याने आगीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत, तर काही ठिकाणी आगी लागल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात शेकडोच्या संख्येने धोकादायक व अनधिकृत इमारती आहेत. शहरात आग लागणे, इमारती कोसळणे किंवा नैसर्गिक आपत्ती ओढवणे अशा प्रसंगी, मदत आणि बचाव कार्याची सूत्रे हाती घेण्याची जबाबदारी आपत्कालीन विभागावर असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत खुद्द हा विभागच एखाद्या ‘आपत्कालीन’ स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

या विभागाचा अतिरिक्त कार्यभार अग्निशमन दलातील अधिकारी राजेश पवार यांच्याकडे होता. मात्र, २८ फेब्रुवारीला ते निवृत्त झाल्यापासून, या पदावर नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. मार्च आणि एप्रिल उलटून गेल्यानंतरही, या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.

भिवंडीमध्ये दरवर्षीच पावसाळ्यात पाणी साचणे, इमारती कोसळणे आणि इतर विविध आपत्तींचे संकट उभे राहत असते. नुकतीच भिवंडी बस स्थानकाजवळ वाहतुकीच्या वेळेस अचानक जुने झाड कोसळून आपत्कालीन स्थिती निर्माण झाली होती. शहरात अजून नाले व गटारे सफाईला सुरुवात झालेली नाही. भविष्यात शहरात अचानक मुसळधार पावसाने एखादी मोठी आपत्ती ओढवली, तर त्यासाठी जबाबदार कोणाला धरले जाईल, हा प्रश्न आहे.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर कर्मचारी
या विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची स्थितीही अत्यंत चिंताजनक आहे. अनेक कर्मचाऱ्यांकडे संगणकाचे प्राथमिक ज्ञानही उपलब्ध नाही. हा विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जलद प्रतिसाद क्षमतेवर अवलंबून असतो. असे असूनही, सध्या विभागाचे कामकाज अशा कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालवले जात आहे, जे स्वतःच निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

स्वतंत्र अधिकाऱ्याचा प्रस्ताव
महापालिकेचे मुख्यालय उपायुक्त विक्रम दऱ्हाडे यांनी सांगितले की, आपत्कालीन विभागाचे काम अग्निशामक दल विभागाचे प्रमुख राजेश पवार हे पाहत होते. ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी प्रभारी अधिकारी नितीन चव्हाण हे काम पाहत आहेत. त्यामुळे आपत्कालीन विभागाचे कामदेखील तेच पाहत आहेत. मात्र, अग्निशामक दल आणि आपत्कालीन विभागाचे स्वतंत्र विभागप्रमुख असावे, अशी मागणी वाढल्याने सामान्य प्रशासनाच्या उपायुक्त सपना वसावा यांच्याकडून आपत्कालीन विभागासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याचा प्रस्ताव मागविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP मध्ये बंडखोरीचा भडका! पक्ष आणि अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया समोर; ७ खासदारांचे नाव घेत भाजपवर गंभीर आरोप

Mumbai: आजारपणाला कंटाळला; केईएम रुग्णालयातच युवकाने धक्कादायक निर्णय घेतला, घटनेनं मुंबईत खळबळ

Latest Marathi News Live : 7 खासदारांनी तडकाफडकी पक्ष सोडल्यानंतर आम आदमी पार्टीची पहिली प्रतिक्रिया

Pali News : रिलायन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याची मुजोरी; अपघाताचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावला

"ऐ, पार्टनर, आज सेलिब्रेशन तो बनता है!" विनोद कांबळी शिवाजी पार्क मैदानावर पोहोचला, सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी दिलं सरप्राईज Video

SCROLL FOR NEXT