मुंबई

शिक्षण सेवकांचा आज कॅन्डलमार्चचे आयोजन

CD

शिक्षणसेवकांचा आज कँडल मार्च

रोहा, ता. २४ (बातमीदार) : तालुक्यातील १२ शिक्षकांचा २०२४ पासून आतापर्यंत अकाली मृत्यू झाला आहे. या शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी (ता. २५) रोहा शहरातील मारुती चौकात सायंकाळी ६ वाजता शिक्षणसेवकांकडून कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबतचे निवेदन पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मेघना धायगुडे, उपसभापती संजय मांडळुस्कर, तहसीलदार किशोर देशमुख, पोलिस निरीक्षक मारुती पाटील, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, उपाध्यक्ष अहमद दर्जी यांना देण्यात आल्याची माहिती शिक्षणसेवक शोभा खांडेकर यांनी दिली. या कँडल मार्चमध्ये रायगड जिल्ह्यातील २०० हून अधिक शिक्षणसेवक सामील होणार आहेत. रोहा शहरातील मारुती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असे या कँडल मार्चचे स्वरूप असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोभा खांडेकर, कल्याणी भोसले, प्रशांत अहिरराव, शिवकुमार माने, निवृत्ती शिंदे, रणजीत मिरगणे, स्वप्नील पाटील, अतुल बोंद्रे, प्रभाकर तुपे, मयूर पाटील, शिवशंकर डांगे हे अथक परिश्रम घेत आहेत.
---------------------
प्रतिक्रिया

शिक्षण सेवा देत असताना अचानक १२ क्षिक्षकांचा अकाली मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. हा कँडल मार्च पूर्णपणे मौन पाळून आणि शांततेत काढण्यात येईल. याचा वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची पूर्णतः दक्षता घेतली जाणार आहे.
- शोभा खांडेकर, शिक्षणसेवक प्रतिनिधी
-----------------
फोटोओळ : कँडल मार्चबद्दल पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांना निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP मध्ये बंडखोरीचा भडका! पक्ष आणि अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया समोर; ७ खासदारांचे नाव घेत भाजपवर गंभीर आरोप

Mumbai: आजारपणाला कंटाळला; केईएम रुग्णालयातच युवकाने धक्कादायक निर्णय घेतला, घटनेनं मुंबईत खळबळ

Latest Marathi News Live : 7 खासदारांनी तडकाफडकी पक्ष सोडल्यानंतर आम आदमी पार्टीची पहिली प्रतिक्रिया

Pali News : रिलायन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याची मुजोरी; अपघाताचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावला

"ऐ, पार्टनर, आज सेलिब्रेशन तो बनता है!" विनोद कांबळी शिवाजी पार्क मैदानावर पोहोचला, सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी दिलं सरप्राईज Video

SCROLL FOR NEXT