अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे डिजीटल पाऊल
ॲपमुळे लाभार्थ्यांना थेट मोबाईवरुन सेवा
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने योजनांच्या प्रक्रियेसाठी ॲप सुरू केले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ असे ॲपचे नाव असून गुगल प्ले स्टोअरवर हे उपलब्ध आहे. लाभार्थ्यांना योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवर करता येणार आहे. महामंडळाच्या योजनांसाठी www.udyog.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित असून, महामंडळाची संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन स्वरुपात राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी दिली आहे.
योजनांच्या प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना संगणकाचा वापर करावा लागत असल्याने किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना निदर्शनास असल्यामुळे वेळ, खर्च आणि अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून महामंडळाने सप्टेंबर २०२५मध्ये नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्रांशी करार करुन योजनांच्या सेवा प्रति सेवा ८५ रु. दराने उपलब्ध करुन दिल्या. लाभाथ्र्यांना अधिक स्वयंपूर्ण, सुरक्षित आणि सुलभ सेवा करुन देण्यासाठी महामडळामार्फत वापरकर्ता अनुकुल मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.