मुंबई

लोखंडी सळई वाहतूक कंटेनरचा अपघात

CD

भिवंडी, ता. २४ (वार्ताहर) : भिवंडी-वाडा रस्त्यावर शुक्रवारी (ता. २४) सकाळी अनगाव गावामध्ये लोखंडी सळईची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला. अवजड माल वाहून नेताना कंटेनरचा पाटा तुटून चालकाची कॅबिन वेगळी झाली. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने चालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

भिवंडी-वाडा रस्त्याचे काँक्रीटीकरण अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता नादुरुस्त असल्याने मागील काही वर्षांपासून अपघाताला कारणीभूत ठरत आहे. या अपघातामुळे कंटेनर रस्त्यात आडवा झाल्याने या रस्त्यावर दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या रस्त्यावर एका बाजूने काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. तसेच मोठ्या प्रमाणात खड्डेही पडलेले असल्याने या रस्त्यावर कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP मध्ये बंडखोरीचा भडका! पक्ष आणि अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया समोर; ७ खासदारांचे नाव घेत भाजपवर गंभीर आरोप

"ऐ, पार्टनर, आज सेलिब्रेशन तो बनता है!" विनोद कांबळी शिवाजी पार्क मैदानावर पोहोचला, सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी दिलं सरप्राईज Video

Pali News : रिलायन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याची मुजोरी; अपघाताचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावला

Latest Marathi News Live : 7 खासदारांनी तडकाफडकी पक्ष सोडल्यानंतर आम आदमी पार्टीची पहिली प्रतिक्रिया

Hardik Pandya: "जा, जाऊन झोप; घरी पोहोचल्यावर कॉल कर!" मुंबई इंडियन्स हरली अन् कॅप्टन पांड्याचं भलतंच काहीतरी चाललंय...

SCROLL FOR NEXT