मुंबई

वाशीतील बसस्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव

CD

वाशीतील बस स्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव
शेड, पिण्याचे पाणी आणि बाकांचे दुर्भिक्ष्य
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबईतील वाशी सेक्टर सात येथील महापालिका परिवहन उपक्रमाच्या बस स्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असून, शेड नसल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः भरउन्हात नागरिक, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना बसची वाट पाहत उभे राहावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबईसारख्या आधुनिक आणि नियोजनबद्ध शहरात, तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम मानल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतच अशी परिस्थिती असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बस स्थानकावर शेड नसल्याने उन्हाळ्यातील कडक उन्हाचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. वाढत्या तापमानामुळे अनेकदा नागरिकांना उष्माघात, चक्कर येणे, थकवा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, बस स्थानकावर ना शेड, ना पिण्याच्या पाण्याची सुविधा, ना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था, अशा स्थितीत प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने बस स्थानकावर मजबूत शेड उभारण्याची, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची तसेच बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. नागरिकांना सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली.
नवी मुंबई महापालिका आणि परिवहन प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT