मुंबई

मुरबाडमध्ये बायोमेट्रिक प्रणालीकडे दुर्लक्ष

CD

टोकावडे, ता. २७ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली लागू करण्याबाबत सरकारचे स्पष्ट आदेश असतानाही अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या पारदर्शकता व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते वामन खाकर यांनी सांगितले.
ग्रामविकास व सामान्य प्रशासन विभागाच्या सरकारी निर्णयानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार मुरबाड पंचायत समितीनेही २६ फेब्रुवारीला आदेश काढून संबंधित ग्रामपंचायतींना प्रणाली कार्यान्वित करून अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायतींमध्ये या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी बायोमेट्रिक यंत्रणा बसविलेली नाही, तर काही ठिकाणी बसवूनही नियमित वापर होत नसल्याच्या तक्रार आहे. परिणामी, उपस्थिती व्यवस्थापनात पारदर्शकता नसून कार्यालयीन शिस्तीवरही परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात वामन खाकर यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. वरिष्ठांचे आदेश न पाळणे हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ तसेच शिस्त व अपील नियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच, पंचायत समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर बायोमेट्रिक प्रणाली लागू केलेल्या ग्रामपंचायतींची यादी जाहीर करावी, जेणेकरून पारदर्शकता वाढेल आणि इतर ग्रामपंचायतींवरही अनुपालनाचा दबाव निर्माण होईल, अशी सूचनाही करण्यात आली आहे. दरम्यान, बायोमेट्रिक प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास उपस्थिती व्यवस्थापन अधिक पारदर्शक होऊन कामकाजाची गती वाढेल आणि गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यासाठी पंचायत समिती आदेश देते, जिल्हा प्रशासनही सकारात्मक आहे. मात्र, प्रत्यक्षात ग्रामसेवकांकडून आदेशांचे पालन होताना दिसत नाही. ही बाब गंभीर असून पारदर्शकता व कार्यक्षमतेचे उल्लंघन आहे.
- वामन खाकर,सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी नाचत-गात होती प्रसिद्ध अभिनेत्री; पण नंतर घडलं भयंकर, संचिता उगलेनं टोकाचा निर्णय का घेतला?

गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

Latest Marathi News Live Update : नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

भर गर्दीत रश्मिकाने घेतली विजयची खास काळजी; viral video पाहून नेटकरी म्हणाले, ‘अशी बायको सगळ्यांनाच मिळो!’

SCROLL FOR NEXT