नागरी सुविधा भूखंड हस्तांतरणाची मागणी
सीवूड्सच्या सर्वांगीण विकासासाठी सिडकोकडे पाठपुरावा
जुईनगर, ता. २४ (बातमीदार) : सीवूड्स परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरी सुविधा भूखंड नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल डोळस यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. माजी खासदार संजीव नाईक यांच्या माध्यमातून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन ही मागणी मांडण्यात आली. वाढती लोकसंख्या, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि सामाजिक-सांस्कृतिक सुविधांची कमतरता लक्षात घेऊन सार्वजनिक हितासाठी या भूखंडांचा वापर करण्यावर भर देण्यात आला.
सीवूड्स परिसरात व्यायामशाळा, महिला सक्षमीकरण केंद्र, सांस्कृतिक भवन आणि झुणका भाकर केंद्र उभारण्यासाठी हे भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सांस्कृतिक भवनामुळे स्थानिक कला आणि सामाजिक उपक्रमांना व्यासपीठ मिळेल, तर झुणका भाकर केंद्रामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात अन्नसुविधा मिळू शकतील. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या प्रस्तावाची सकारात्मक दखल घेत लवकरच विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.
या बैठकीत रस्ते, सार्वजनिक सेवा आणि इतर विकासकामांवरही चर्चा झाली. या पाठपुराव्यामुळे नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला असून, विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट
महिलांसाठी सक्षमीकरण व युवकांसाठी सुविधा
हे भूखंड मिळाल्यास महिलांसाठी सक्षमीकरण केंद्र उभारून त्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील. तसेच तरुणांसाठी सुसज्ज अभ्यासिका आणि व्यायामशाळा उभारल्यास त्यांच्या शैक्षणिक व शारीरिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते विशाल डोळस यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.